मी सौ. नेहा अंकुर राऊत, बोईसरच्या
विकासासाठी आपल्या सेवेस तयार.
सौ. नेहा अंकुर राऊत
मी नेहा अंकुर राऊत, बोईसरमध्येच वाढलेली आणि इथल्या प्रत्येक गल्ली-बोळातील वास्तव जाणणारी एक सामान्य गृहिणी. माझं बालपण बोईसरच्या झोपडपट्टी भागात गेले असल्यामुळे, त्या भागातील समस्या, अडचणी, रोजची धडपड आणि विकासाच्या गरजा मला जिव्हाळ्याने माहीत आहेत. बोईसर हा शहर आणि झोपडपट्टी या दोनही वास्तवांचा संगम असलेला परिसर आहे, आणि दोन्ही बाजूंचा समन्वय साधून विकास घडवणे हे माझे स्वप्न आहे.
मी B.Com शिक्षण पूर्ण केले आहे आणि सध्या एक गृहिणी म्हणून व पती बरोबर त्याचा व्यवसाय सांभाळून सामाजिक कामातही मी सक्रिय सहभाग घेते.
माझे पती अंकुर राऊत हे व्यवसायिक असून समाजसेवक आणि राजकारणातही सक्रिय आहेत. माझे सासरे शिक्षक होते आणि नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्याकडून आम्हाला शिक्षण, प्रामाणिकपणा आणि लोकांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली.
मी बोईसरचीच मुलगी आहे. इथल्या मातीचा सुगंध आणि इथल्या लोकांची कष्टमय जीवनशैली मला माहीत आहे. चाळ असो किंवा बोईसर शहर, प्रत्येक कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी कटिबद्ध आहे. तुमचा विश्वास आणि आशीर्वाद माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. बोईसरच्या विकासासाठी तुमची साथ हवी आहे.
ध्येय आणि उद्दिष्टे (Vision & Mission)
बोईसरचा सर्वांगीण विकास – शहरी असो वा चाळीतील परिसर, प्रत्येक भागाला समतोल सुविधांचा लाभ.
महिलांसाठी सुरक्षित, सशक्त आणि प्रगतीशील वातावरण तयार करणे.
युवकांना रोजगार, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणे.
पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांची मजबुतीकरण.
पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासन.
शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवणे.
भाजपा पालघरचे स्तंभ
पदाधिकारी
अहमद खान
वाहतुक आघाडी जिल्हाध्यक, पालघरश्री भारत राजपूत
जिल्हाध्यक्ष – भारतीय जनता पार्टी, पालघरबाबाजी कथाळे
भाजपाचे ज्येष्ठ, अनुभवी व सर्वमान्य कार्यकर्तेडॉ. श्री हेमंत सावरा
खासदार, पालघर लोकसभाश्री हरिश्चंद्र भोये
आमदार, विक्रमगड मतदारसंघसदस्य
दुर्गेश मिश्रीलाल सोलंकी
सुभाष पंडित
प्रकाश सिंग
महेंद्र भोने
Needs Help? Let’s Get in Touch
-
Call US Now? +91 860 5667 788
-
ADDRESS Neha Ankur Raut
Block No T-1/160, Opposite Ayappa Temple, Cidco Colony Boisar, Tarapur Road, Boisar, Taluka And Dist - Palghar, Pin 401501
-
HAVE A QUESTION? +91 902 8067 788